
वृद्धापकाळ सुरू झाल्यानंतर बहुतांश घरांतील आजी-आजोबांना श्रवण दोष विकार सुरू होतात. कमी ऐकू येऊ लागल्यामुळे समोरच्याला त्यांच्याशी ओरडून किंवा मोठ्याने बोलावे लागते. बाकी सर्व कुटुंब घेत असलेल्या गोष्टींचा आनंद या आजी-आजोबांना व्यवस्थित घेता येत नाही. त्यातूनच त्यांच्या मनाचा कोंडमारा सुरु होतो. घरात माझे आता कुणी ऐकत नाही, मी आता काही कामाचा/कामाची नाही, मी आता परिवारावर ओझेच आहे यांसारखे नकारात्मक विचार अशावेळी या वृद्धांच्या डोक्यात घोंगाऊ लागतात. या सर्व प्रकारामुळे ही वृद्ध मंडळी एकटे राहू लागतात. इतरांशी बोलणे टाळू लागतात. वाटायला श्रवण दोष ही छोटी आणि वरवरची समस्या वाटते पण या विकाराचे दूरगामी परिणाम वृद्धांवर तर होतातच परंतु कुटुंबावर देखील होत जातात. म्हणून वेळीच यावर योग्य ते उपाय आणि उपचार करणे आवश्यक आहे.
* श्रवण दोषाची लक्षणे *
• सामूहिक चर्चा, फोनवरील संभाषण, काही अंतरावरील बोलणे, टीव्ही इ. वरील आवाजात गडबड – गोंगाट वाटणे किंवा व्यवस्थित ऐकू न येणे इ.
उपाय आणि उपचार याविषयी चर्चा करण्याआधी श्रवण दोषाची कारणे कोणती आहेत ते बघू या;
* श्रवण दोषाची कारणे *
• अनुवंशीक/वंश परंपरागत श्रवण दोष
• नियमित घेत असलेल्या औषधोपचाराचे दुष्परिणाम.
उदा. कँसर, टीबी, मधुमेह, ह्रुदयरोग यासारख्या इतर गंभीर आजारांच्या औषधोपचाराचे दुष्परिणाम.
• सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहणे.
• ह्रदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारात रक्तवाहिन्या अरूंद होतात. या आजारांचा संबंध श्रवणशक्ती कमी होण्याशी असू शकतो.
• धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ऐकू न येण्याची समस्या लवकर निर्माण होते.
* श्रवण दोष – उपचार व पर्याय *
• वृद्धापकाळामुळे श्रवणशक्ती नैसर्गिकरित्या कमी होते. अशावेळी विज्ञानाचा आधार घेऊन श्रवणयंत्र या पर्यायाचा विचार करणे कधीही चांगले.
• श्रवणशक्ती किती कमी झाली आहे हे तपासण्यासाठी मानांकीत, विश्वासू आणि अनुभवी तज्ज्ञांकडून “आॕडिओमेट्री” या चाचणी सोबतच “स्पीच डिस्क्रीमीनेशन स्कोअर” ही चाचणीही केलेली चांगली.
• वयाची चाळीशी ओलांडल्या नंतर वर्षातून एकदा कानांची तपासणी करणे.
• Audiometry चाचणीवरुन Audiologist तुमच्या श्रवण दोषचा प्रकार किंवा पातळी, गरज, तुमचे व्यक्तीत्व, प्रोफेशन व पारिवारीक पार्श्वभूमी इ. वरून तुमच्यासाठी कोणते श्रवण यंत्र योग्य आहे याची माहिती व सल्ला व्यवस्थित देऊ शकतात.
• या चाचण्यांमध्ये काही गडबड असल्यास श्रवणयंत्र वापरण्यास सुरुवात करणे.
• श्रवणयंत्राची निवड देखील तज्ञांच्या सल्ल्यानेच करावी. केवळ जाहिरातींचा भडीमार आहे किंवा किंमत कमी आहे म्हणून असल्या आमिषांना बळी पडू नये.
• श्रवण दोषाचे लवकर निदान करून श्रवण यंत्राचा वापर सुरू केल्यास चांगले रिझल्ट्स मिळू शकतात.
• श्रवण यंत्र हे वेगवेगळ्या साईज व Technology नुसार उपलब्ध आहेत. सध्याचे श्रवण यंत्र हे रिचार्जेबल, वायरलेस कनेक्टीव्हीटी असणारे, Hearing Aid नियंत्रित होऊ शकणारे आहेत.
इंग्रजीत एक म्हण आहे,
Prevention is better than cure.
याचे पालन करु या, श्रवण दोषाला हद्दपार करू या…!
Leave Your Comment