Call Us +919700704217
Advanced
Search
  1. Home
  2. लहान मुलांतील श्रवण दोष
लहान मुलांतील श्रवण दोष

लहान मुलांतील श्रवण दोष

  • February 10, 2021
  • 2 Likes
  • 272 Views
  • 0 Comments
68 / 100
लहान मुलांतील श्रवण दोष, भविष्यकाळातील धोक्याची घंटा
साधारणपणे आपल्या भारतात जो पर्यंत एखादी समस्या धोक्याची पातळी ओलांडत नाही तो पर्यंत आपण त्या समस्यांना सीरीयसली घेत नाहीत. त्यापैकीच एक आहे लहान बाळातील श्रवण दोष. आयडीयली बाळाच्या जन्मापासून दुसऱ्या आठवड्याच्या आत कानाची तपासणी करणे अत्यावश्यक आणि कायद्याने बंधनकारक तर आहेच परंतु सर्व लहान मुलांच्या या संबंधीच्या तपासण्या करणे अत्यावश्यक आहे. परंतु आपली *बघू नंतर* ची मानसिकता ब-याचदा नवजात शिशुंच्या श्रवणदोषासाठी कारणीभूत ठरते. एका अहवालानुसार OAE व BERA टेस्ट मध्ये प्रत्येक हजार मुलांमागे 2 ते 4 मुलांना श्रवणदोष जन्मतःच असतो. पण आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो.
*जन्मानंतर नवजात शिशुच्या कानाची तपासणी करणे आवश्यक का आहे?*
• श्रवणदोष हा बाहेरून दिसून येत नाही. म्हणून भविष्यातील संकट टाळण्यासाठी जन्मानंतर बाळाची श्रवणदोष तपासणी आवश्यक आहे.
• श्रवणदोष लवकर लक्षात नाही आला तर (3 महिन्यात) त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
• लहान बाळास जितक्या लवकर ऐकायला येईल तितक्या लवकर त्याची वाचा व भाषेची प्रगती होते.
• ज्या मुलांमध्ये जन्मतःच श्रवणदोष असतो आणि उशिरा निदान होते त्या मुलांमध्ये वाचा आणि भाषेची प्रगती खुंटत राहते.
*कोणत्या मुलांमध्ये श्रवण चाचणी करणे आवश्यक आहे*
• कमी दिवसाचा जन्म.
• जन्मानंतर उशिरा रडणे.
• वजन 1500 ग्रॅम पेक्षा कमी असणे.
• परिवारात जेनेटीकली श्रवणदोषाचा इतिहास असणे.
• कावीळ वा मेंदूज्वर असणे.
• बाळाला काचेच्या पेटीत जास्त वेळ ठेवलेले असणे.
Social Media Handles :
Instagram : @ninadhearingclinic
  • Share:

Leave Your Comment