Call Us +919700704217
Advanced
Search
  1. Home
  2. ऐकणे म्हणजे काय?
ऐकणे म्हणजे काय?

ऐकणे म्हणजे काय?

  • September 8, 2021
  • 0 Likes
  • 1471 Views
  • 0 Comments
66 / 100

Hearing ऐकणे म्हणजे काय?
मानवाच्या पाच ज्ञानेंद्रिया पैकी एक म्हणजे ऐकणे. ऐकणे म्हणजे मानवास आवाजबद्दल संवेदना.
म्हणजे नेमके काय असते? आपल्या आजूबाजूला नेहमी आवाज होत असतो एक म्हणजे वातावरणीय जसे मोटरगाड्यांचा, गाण्यांचा, उपकरणांचा व बोलण्याचा. तो आवाज कानामार्फत आपल्या मेंदूपर्यंत जातो व आपल्याला त्याचा अर्थ कळतो. की बाबारे आपणास कुणीतरी हाक मारली, मोबाईलची बेल वाजली, मोटरगाडीचा हॉर्न चा आवाज. या सर्व प्रक्रियेस ऐकणे अस म्हणतात.
ऐकण्याचा हेतू काय असतो?
या प्रक्रिये मूळे आपणास बाबींचा, बोलण्याचा अर्थ कळतो व संभाषण बद्दल मदत होते.
धोकादायक परिस्तिथी पासून बचाव करू शकतो.
Verbal Communication मध्ये मदत होते.
ऐकण्याची स्तिथी ( Hearing level) बद्दल कसं कळू शकते?
मानवाची ऐकण्याची स्तिथी जाणून घेण्यासाठी आपल्या नजदिकच्या श्रवण तज्ञा कडे जाऊन आपल्या कानाची ऐकण्याची तपासणी (Audiometry Test) करून घ्यावी.
ज्या व्यक्तीला सामन्याच्या तुलनेत मोठा आवाज लागतो, किंवा सदर व्यक्तींशी बोलण्या साठी बोलणाऱ्याला मोठ्यांनी बोलावे लागते. अश्या व्यक्तींनी तात्काळ आपल्या कानाची ऐकण्याची तपासणी करून डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपाय करावे.
लहान मुले ज्याचा जन्म अति जोखमी परिस्तिथीत झाला आहे. अश्या पालकांनी आपल्या बालकांची त्वरित कानाची ऐकण्याची तपासणी करून घ्यावी. यामुळे आपणास त्यांना मूक बधिर होण्यापासून वाचवता येत. कारण अश्या बालकांमध्ये जन्मतः बधिरता असू शकतो व वेळीच उपाय केला तर आपण त्यांना चांगले भविष्य देऊ शकतो. ते सुद्धा तुम्हा माझ्या सारखे बोलण्यातील संवाद साधू शकतात.
बधिरतेमुळे काय परिणाम होऊ शकतात?
बधिरता ही मुख्यतः दोन व्यक्ती मध्ये १. लहान मुले २. मोठी माणसे या मध्ये वेगवेगळे परिणाम होतात.
१) लहान मुलांमधील वाचा भाषा विकास खंडित होतो.
२) ते अतिशय हट्टी, चिडचिडी होऊ शकतात.
३) बोबळे किंवा तोतळे बोलू शकतात.
४) मोठ्या माणसासोबत मोठ्यांनी बोलावे लागते त्यामुळे बोणाऱ्याला चिडचिड व ऐकणाऱ्यालाही चिडचिड होते.
५) हळू ते रागीट होतात.
६) निद्रा नाश होतो ( कानात शिट्टी सारखा आवाजामुळे).
श्रवण दोष ओळखायचा कसा?
एखाद्या व्यक्तीस, किंवा लहान मुलास तीन किंवा चार वेळा आवाज द्यावा लागत असेल.
किंवा त्याच्याशी मोठ्यांनी समान्यांपेक्षा मोठ्यांनी बोलावे लागत असेल.
एखादा मोठा आवाज झाला तरी त्याला काहीही संवेदना होत नसेल.
लहान बाळ मोठया आवाजास दचकत नसेल.( अगदी कुकरची शिट्टी, फटका)
तर त्वरित आपण आपल्या कानाची ऐकण्याची तपासणी करून घ्यावी.
ऐकण्याची तपासणी कुणाकडून करून घ्यावी?
ऐकण्याची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना ऑडिओलिजिस्ट किंवा श्रवण तज्ञ अस म्हणतात.
ऑडिओलॉजिस्ट हा श्रवण, वाचा, भाषा विज्ञान या विषयात पदवी धारक किंवा पदव्युत्तर असतो. (Bachelor or Master in AUDIOLOGY AND SPEECH LANGUAGE PATHOLOGY) किंवा सदर विषयात PhD धारक असतो. तसेच तो भारतीय पुनर्वसन परिषदेचा नोंदणी धारक ( Registered professional in Rehabilitation Council of India).
तसेच INDIAN SPEECH AND HEARING ASSOCIATION किंवा STATE AUDIOLOGY AND SPEECH LANGUAGE ASSOCIATION चा सभासद असतो.
लक्षात ठेवा आपल्या कानाच्या ऐकण्याबद्दल योग्य सल्ला हवा असेल तर REGISTERED PROFESSIONAL AUDIOLOGIST व SPEECH PATHOLOGIST कडूनच आपल्या कानाची ऐकण्याची तपासणी करून घ्यावी.
तुमचे ऐकणे खूप महत्वाचे आहे आपली फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी.
नोंदणी कृत ऑडिओलॉजिस्ट आमच्या वेबसाईटला आहेत. आपल्या नजदीकच्या ऑडिओलॉजिस्ट बाबत आजच माहिती मिळवा.

Leave Your Comment